चिपळूण:-आदर्श आचारसंहितेचा भंग होणार याची काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी करूनही सोशल मीडियाच्या माध्यमातून निवडणुकीसंदर्भात आक्षेपार्ह पोस्ट टाकण्याचे प्रकार सुरूच आहेत. आचारसंहिता भंग होऊ नये यासाठी चिपळूण पोलिसांकडून सोशल मीडियावर बारीक लक्ष आहे. मंगळवार 22 ऑक्टोबर रोजी सोशल मीडियावर एका पक्षाबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी चिपळुणात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील बक्षी असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. बक्षी याने ही पोस्ट सोमवार 21 ऑक्टोबर रोजी दुपारी 3.39 वाजण्याच्या सुमारास टाकली होती.
याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात धर्मावरून समाजात व्देषाची व शत्रुत्वाची भावना निर्माण करणारी आचार संहितेच्या भंग करणारी सोशल मिडीयावरील स्वतःचे फेसबूक अकौंटवरून दिनांक 21/10/2024 रोजी 15.39 वा. चिपळूण येथून प्रसारित केली म्हणून बक्षी त्यांचेविरुध्द लोक प्रतिनिधी कायदा अधिनियम 1951 चे कलम 125, भा. न्या. संहिता 2023 चे क. 353(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.