रत्नागिरी:-तालुक्यातील पावस एसटी स्टँड येथील दुकानाच्या आडोशाला चालणाऱ्या मटका- जुगारावर पोलिसांनी छापा टाकून एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केल़ा. सचिन पांडुरंग बंडबे (44, ऱा कोळंबे रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आह़े. त्याच्या ताब्यातून रोख रक्कम व मटका जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आल़े. पावस एसटी स्टँड येथील परिसरात मटका-जुगार चालवला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होत़ी. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून कारवाई केल़ी पूर्णगड पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार प्रशांत पाटील यांनी तक्रार दाखल केल़ी.