रत्नागिरी:-तालुक्यातील चांदेराई येथे विषारी द्रव प्राशन करणाऱ्या तरुणाला गंभीर अवस्थेत जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल़े. अज्ञात कारणातून या तरुणाने विषारी द्रव प्राशन केले. सतीश मोहन सुर्वे (40, ऱा चांदेराई, रत्नागिरी) असे तरुणाचे नाव आह़े. 20 ऑक्टोबर रोजी सतीश याने राहत्या घरी मानसिक तणावातून विषारी द्रव प्राशन केल़े. यानंतर त्याला अत्यवस्थ वाटू लागल्याने नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालय येथे दाखल केले. येथे त्याच्यावर सद्या उपचार सुरू आहेत. याबाबतची नोंद पोलिसात करण्यात आली आह़े.