खेड:- खेड एसटी स्थानकातील सुलभ शौचालयानजिक नथुराम धर्मा धोत्रे (50, रा. मोरवंडे-बौद्धवाडी, खेड) यांना चोरट्याने धक्का मारत खाली पाडून त्यांच्या खिशातील 14 हजार रूपये चोरले. या प्रकरणी येथील पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नथुराम धोत्रे हे बसस्थानकातील सुलभ शौचालयात गेले होते. त्या ठिकाणी त्यांना एका अज्ञात व्यक्तीने पाठीमागून धक्का मारत खाली पाडले आणि दाबून ठेवले. त्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत असताना अज्ञाताने फुलपॅन्टच्या खिशातील 14 हजार रूपये चोरले. त्यानंतर अज्ञाताने घटनास्थळावरून पलायन केले. या प्रकारानंतर धोत्रे यांनी पोलीस स्थानक गाठत तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला.