दापोली : तालुक्यातील दाभोळ पंचनदी येथे विनापरवाना दारू साठा बाळगल्याप्रकरणी नितीन प्रभाकर आरेकर (55, रा. पंचनदी आरेकरवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाभोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार 19 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6ः15 वाचण्याच्या सुमारास पंचनदी आरेकरवाडी येथे नितीन आरेकर हा सुमारे 10 लिटर गावठी दारूसह आढळून आला. आरेकर याने हातभट्टीची दारू गैर कायदा व विनापरवाना जवळ बाळगल्याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 कलम 65(इ) नुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास दाभोळ पोलीस करीत आहेत.