दापोली : तालुक्यातील खेर्डी पांढरीची वाडी येथे विनापरवाना गावठी दारूचा साठा बाळगल्या प्रकरणी अरुण नारायण करबेले या 62 वर्ष वृद्ध यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवार दिनांक 20 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6ः50 वाजता खेर्डी पांढरीची वाडी येथे अरुण करबेले हा संशयितरित्या आढळून आला. त्याच्या घराच्या पुढील बाजूस असलेल्या पडवीमध्ये त्याच्या ताब्यात सुमारे 8 लिटर गावठी हातभट्टीची दारू आढळून आली. दापोली पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 कलम 65(इ) नुसार गुन्हा दाखल केला असून अधिक तपास दापोली पोलीस करीत आहेत.