खेड:-तालुक्यातील तळे – चिंचवाडी येथील युवकाचा मुंबई येथे बहिणीला डबा देऊन परतताना अपघाती मृत्यू झाला.
सागर संतोष शिंदे (17) असे मृत युवकाचे नाव आहे. सागर हा रविवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास सागर शिंदे हा कळवा हॉस्पीटलमध्ये ऍडमिट असलेल्या बहिणीला डबा देण्यासाठी गेला होता. डबा देवून येत असताना लोकल रेल्वेगाडीच्या दरवाजातून पडून त्याचा मृत्यू झाला. त्याच्यावर साबेगाव-दिवानजीकच्या स्मशानभूमीत सोमवारी सकाळच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, बहिण असा परिवार आहे.