खेड / प्रतिनिधी:-मुंबई-गोवा महामार्गावरील लोटेनजीक बस व मारूती सुझुकी कार यांच्यात झालेल्या अपघातप्रकरणी कार चालक दिलीप शांताराम सावंत (60, रा. भांडुप-मुंबई) यांच्यावर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बसचालक दिलीप शंकर जोंधळे हे आपल्या ताब्यातील (एम.एच.20/बी.एल.0438) क्रमांकाची चिपळूण-खेड बस घेवून जात असताना लोटे औद्योगिक वसाहतीतील एस.आर.ड्रग्स कंपनीसमोर पाठीमागून येणाऱ्या (एम.एच.03/ए.एम.5241) क्रमांकाच्या कारने धडक देवून अपघात केला. त्यानुसार कारचालकावर रविवारी सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.