रत्नागिरी:-रत्नागिरी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील रिक्त पदांकरीता प्रवेशाची संधी पुन्हा एकदा उपलब्ध झाली असून त्याकरीता विविध ट्रेडसाठी 100 जागा उपलब्ध आहेत.
औ.प्र. संस्थेचे प्राचार्य शशिकांत कोतवडेकर यांनी सांगितले की, डेडस्टॉप पब्लिशिंगच्या 39 जागा, फुड प्रोडक्शनच्या 11, आयटी सीएसएम-2, मशिनिस्ट – 4, मशिनिस्ट ग्राइंडर-2, एमएमटी-3, पंप ऑपरेटर व दुरुस्ती – 11 सुईंग टेक्नॉलॉजीच्या 11, टर्नरच्या 3, वुड वर्क टेक्निशिअनच्या 15 जागा अशा एकूण 100 जागांसाठी पुन्हा प्रवेश प्रक्रिया राबवण्याचे ठरवण्यात आले आहे. 19 ते 23 ऑक्टोबर दरम्यान आयटीआय रत्नागिरी येथील ट्रेडसाठी अर्ज भरावेत. ज्यांनी आजपर्यंत प्रवेश घेतला नाही किंवा पुरवणी दहावी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत त्यांच्यासाठी ही संधी आहे. प्रवेशासाठी काही अडचण असल्याचे संतोष पावसकर 8421979663 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.