30 ऑक्टोबर रोजी छाननी
4 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत
रत्नागिरी:-विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया 22 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात संबंधित विभागीय अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर होणार आहेत. त्यामुळे सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांची दालने उमेदवारी अर्ज भरण्याच्या दृष्टीने सज्ज करण्यात आली आहेत.
21 ऑक्टोबरपासुन उमेदवारी अर्ज ( नमुना -1 ) मिळण्यास सुरुवात झाली आहे. 29 ऑक्टोबरपर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार आहेत. 30 ऑक्टोबर रोजी अर्जांची छाननी होणार असून 4 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.
अर्ज दाखल करत असताना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात उमेदवारासह फक्त पाच व्यक्तींना प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच परिसरात तीन पेक्षा जास्त वाहने आणण्यासही मज्जाव करण्यात आलेला आहे.