राजापूर / तुषार पाचलकर:-रत्नागिरी जिल्हा हौशी खो खो असोसिएशन सावर्डा (डेरवण) या क्रिडांगणावर रत्नागिरी जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत ओणी संघाने नेत्रदीपक कामगिरी केली. या ओणी संघातील तीन खेळांडूची उस्मानाबाद (धाराशीव) येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत जिल्हा संघात निवड झाली आहे.
27 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर 2024 दरम्यान उस्मानाबाद (धाराशीव) येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धेत रत्नागिरी जिल्हयाचा किशोर व किशोरी संघ सहभागी होणार असून किशोर संघात ओणी येथील राज जडयार, साहिश भाबळे, प्रथमेश गुरव यांची निवड झाली आहे. त्यांनी डेरवण येथे झालेल्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली असल्याने त्यांची राष्ट्रीय संघात निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्यांचेही ओणी परीसरातून अभिनंदन होत आहे.