रत्नागिरी:-चिपळूण तालुक्यातील पाग कास्करवाडी येथील सलीम कास्कर यांची काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक सोशल मीडियाच्या ‘कोकण झोन समन्वयक’ पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तशा प्रकारचे पत्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी समन्वयक शोएब इनामदार, प्रदेश उपाध्यक्ष शेख यांनी पाठवले आहे.
या पत्रात त्यांनी म्हटले आहे, आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तम सामाजिक काम करीत आहात. आपल्या कामाची नोंद घेवून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष मा. आ. डॉ. वजाहतजी मिर्झा यांच्या आदेशाने व अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मा. अहमदजी खान यांच्या मान्यतेने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक सोशल मीडिया विभागाच्या कोकण झोन ‘समन्वयक’ पदी नियुक्ती करण्यात आली आहे. आपण आपले काम तळागाळांतील जनतेपर्यंत पोहचवून काँग्रेस पक्ष बळकट करणार अशी आम्ही आपणाकडून आशा बाळगतो.
तरी आपण आपले नेते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. मल्लिकार्जुन खर्गे, मा. खा. राहुलजी गांधी आणि मा. खा. इमरान प्रतापगढीजी यांच्या विचाराने सर्व सामान्यांसाठी पक्षकार्य करावे ही सदिच्छा व काँग्रेस पक्षाचे नावलौकीक वाढविण्यासाठी सातत्याने काम करावे.