रत्नागिरी:-विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपने आयोजित केलेल्या बूथ सशक्तीकरण योजनेला नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत.
महायुतीमधील मोठा पक्ष असलेल्या भाजपाने रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात क्लस्टर बैठकांना सुरवात केली. अजून जागावाटप झालेले नसले तरी भाजपाला विजयी करण्यासाठी आपला बूथ मजबूत करण्याचा संकल्प या वेळी करण्यात आला. भाजपाचे विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळ माने यांनी कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा आपले सरकार येण्यासाठी प्रोत्साहित केले. माझा बूथ सर्वांत मजबूत या संकल्पनेवर निवडणूक जिंकण्यासाठी क्लस्टर बैठका सुरू झाल्या आहेत. विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळ माने यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक झाली. भाजपाला विजयी करण्याचा संकल्प करण्यात आला. मेरा बूथ सबसे मजबूत, बूथ जितेगा चुनाव जितेगा, बूथ सशक्तीकरण अभियान राबवण्यात आले. माने यांनी आज मिरजोळे, करबुडे, वाटद, मालगुंड येथे बैठका घेतल्या. दुपारनंतर कोतवडे, कासारवेली आणि शिरगाव येथे क्लस्टर बैठकांना चांगला प्रतिसाद मिळाला. रविवारी संगमेश्वर खाडीपट्टा व रत्नागिरी शहरातील बूथच्या क्लस्टरच्या बैठका होणार असून यावेळी बूथप्रमुखांना निमंत्रित केले आहे. नवीन मतदारांचा आढावा, मतदार याद्यांचे वाचन, बूथवर कार्यकर्त्यांनी कसे नियोजन करायचे आहे याबाबत बाळ माने यांनी बूथप्रमुखांना मार्गदर्शन केले. केंद्र व राज्यात आपले सरकार असल्याने डबल इंजिनद्वारे विकास सुरू आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आपले सरकार निवडून येण्याकरिता महायुतीला जास्तीत जास्त जागा मिळाव्यात, असे आवाहनही या वेळी केले.