लांजा : कलगीतुरा उन्नती समाज मंडळ लांजा कार्यक्षेत्र लांजा-राजापूर-रत्नागिरी आयोजित ४० वर्षावरील जाखडी नृत्य स्पर्धा नुकतीच तालुक्यातील रासाई देवी मंदिर कुवे येथे उत्साहात पार पडली.
पारंपरिक लोककला जाखडी नृत्य सादर करण्याची संधी ज्येष्ठ कलाकारांना कलगीतुरा उन्नती समाज मंडळाने उपलब्ध करून दिली होती. या स्पर्धेचे उद्घाटन कलगी तुरा उन्नती समाज मंडळ समन्वय समिती अध्यक्ष अभय सहस्रबुद्धे, मोहन घडशी, कुवे गावचे मानकरी, कलगीतुरा उन्नती समाज मंडळ लांजा कार्यक्षेत्र लांजा-राजापूर-रत्नागिरीचे अध्यक्ष चंद्रकांत पालकर, उपाध्यक्ष विष्णू धाडवे, रविंद्र कोटकर, चंद्रकांत गुरव, संदीप सावंत, देवजी हरमले, दिलीप आग्रे, संदीप सोबण, शशिकांत कानागळ, अमोल शिंदे, आत्माराम धुमक, सुभाष रामाणे, चंद्रकांत जड्यार, मारुती गुरव या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यामध्ये प्रथम क्रमांक गजानन तटकरे- श्री विठ्ठल रखुमाई नाच मंडळ गवाणे गवळीवाडी, श्रीपत रामाणे- बनदेवी नाच मंडळ गवाणे रामाणेवाडी व विष्णू मांडवकर- नवयुग सेवा नाच मंडळ आसगे मांडवकरवाडी यांना द्वितीय क्रमांक विभागूनदेण्यात आला. तृतीय क्रमांक कृष्णा राडये- श्री सत्यनारायण उत्साही नाच मंडळ कुवे मधली उगवतवाडी तर उत्तेजनार्थ चंद्रकांत जडयार- जांगलदेव नाच मंडळ ओणी कोंडवाडी, उत्कृष्ट संच संदीप रांबाडे- नूतन कला जाकडी नृत्य मंडळ लांजा आगरवाडी, उत्कृष्ट गायक रवींद्र नामये- जाकादेवी नाच मंडळ जावडे नामयेवाडी, उत्कृष्ट ढोलकी वादक विजय नेमण- रासाई उत्कर्ष नाच मंडळ कुवे मावळतवाडी स्पर्धेत यश संपादन करण्याऱ्या स्पर्धक जाखडीनृत्य पथकांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कुवे गावचे मानकरी, ग्रामस्थ तसेच सर्व मंडळाचे शाहीर, कलाकार यांचे उत्फुर्तपणे सहकार्य लाभले.