रत्नागिरी:-रत्नागिरीतील महिलेला पार्ट टाईम जॉबमधून लाखो रुपये कमवण्याचे आमिष दाखवून 1 लाख 36 हजार रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याचे समोर आले आह़े. ही घटना 4 ते 10 ऑक्टोबर 2024 दरम्यान घडल़ी. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या महिलेने शहर पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला.
4 ऑक्टोबर रोजी तक्रारदार महिलेला इन्स्टाग्राम अकाऊंटवर पार्टटाईम जॉबसाठी जाहीरात दिसून आल़ी. या जाहिरातीवर क्लिक केली असता एक व्हॉटसऍप नंबर दिसून आल़ा त्यावर महिलेने संपर्क केला असता तुम्हाला ऑर्डर घ्याव्या लागतील व टास्क पूर्ण करावा लागेल अशी बतावणी करण्यात आली. त्यानुसार महिलेने 500, 2 हजार, 7 हजार 5, 2 हजार, 10 हजार 200 व 34 हजार 624 रुपयांची ऑर्डर करुन टास्क पूर्ण केला. यानंतर त्यांच्या युजर खात्यावर 3 लाख रुपये जमा झाले असल्याचे दिसून आले.
खात्यावर जमा झालेले पैसे काढण्यासाठी महिलेकडून विचारणा करण्यात आली. त्यावेळी तुम्हाला टॅक्स भरावा लागेल असे सांगण्यात आले. सुरुवातीला 60 हजार 27 रुपये नंतर 30 हजार रुपये, 10 हजार व 20 हजार, 27 हजार अशी वारंवार पैशाची मागणी करण्यात आली. महिलेने पैसे भरुन देखील त्यांना पैसे मिळाले नाहीत. यानंतर पुन्हा 75 हजार रुपयांची मागणी करण्यात आली. त्यापैकी 20 हजार रुपये महिलेकडून पुन्हा भरण्यात e. यानंतर कोणताही संपर्क होत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे या महिलेच्या लक्षात आले. त्यानुसार या महिलेकडून शहर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांकडून अज्ञाताविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.