रत्नागिरी:-महाराष्ट्र राज्य शिक्षण व क्रीडा संचनालय पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या गोगटे कॉलेज मैदानात रत्नागिरी जिल्हा शालेय क्रीडा स्पर्धेत 19 वर्षाखालील मुलींच्या माध्यमिक विद्यालय भागशाळा व श्रीमती पार्वती शंकर बापट कनिष्ठ महाविद्यालय वाटद खंडाळा येथील संघाने दापोली संघावर 19 धावांनी विजय मिळवला. या विजयामुळे खंडाळा संघाची कोल्हापूर येथील विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आह़े.
खंडाळा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. 3 षटकात सानिया हिने 15 धावा तर मनाली निंबरे 14 धावा करून नाबाद राहिल्या. 7 धावा बाईज मिळाल्या. तर प्रत्युत्तरादाखल दापोली संघाने 3 षटकात 18 धावाच केल्या. मनाली निंबरे, सानिया महाकाळ, संचिता जाधव यांनी भेदक गोलंदाजी केली. क्षेत्ररक्षकांची उत्तम साथ मिळाली. संघामध्ये संचिता जाधव (कर्णधार) सानिया महाकाळ, सलोनी धातकर, मनाली निंबरे, जयश्री शितप (यष्टीरक्षक), पूजा जाधव, निधी डाफळे, वैभवी शिंदे, आश्लेषा लोकरे, अक्षता पवार, तन्वी सावंत, पूर्वा सावंत, सानिका आलीम, दिशा डाफळे हा संघ जिह्याचे कोल्हापूर विभागात नेतृत्व करेल. खेळाडूंना क्रीडा शिक्षक राजेश जाधव, पल्लवी बोरकर यांचे मार्गदर्शन लाभल़े.