खेड:- तालुक्यातील तळवट जावळी येथील 68 वर्षीय वृद्धाचा आकस्मिक मृत्यू झाला. गंगाराम अर्जून धनावडे असे मृत वृद्धाचे नाव आहे. त्यांच्या छातीत दुखू लागल्याने उपचारासाठी रत्नागिरी येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.