चिपळूण : इन्स्ट्राग्राम अकाऊंटवर लिंक पाठवून त्यातूनच एका तरुणाची सुमारे चार लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची फिर्याद शुभम संदशे शेटये (28) यांनी दिली आहे. 28 ते 30 सप्टेंबर या कालावधीत हा प्रकार घडला असून शुभम हा त्याच्या मोबाईलवर इन्स्ट्राग्राम अकाऊंट पहात असताना त्याला त्यावर फ्लिपकार्ड कॉमर्स कमिशन टास्क या नावाची लिंक व फोटो आला. त्यानंतर अज्ञाताने व्हॉटस्ऍपवर संपर्क साधत नोंदणी करण्यास सांगितले. त्यानंतर विविध टास्कच्या माध्यमातून पैसे मिळतील असे सांगून शुभम याच्याकडून वेळोवेळी टास्कच्या माध्यमातून 3 लाख 80 हजार 900 रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार शुभम याच्या लक्षात आल्यानंतर त्याने पोलिसात फिर्याद दाखल केली. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.