चिपळूण : तालुक्यातील वालोपे-गणेशवाडी येथे वाशिष्ठी नदीकिनारी झाडीझुडपाच्या सुरु असलेल्या हातभट्टीवर चिपळूण पोलिसांनी गुरुवारी धाड टाकली. त्यात 1 लाख 9 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी हातभट्टीचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी मंगेश मधुकर दिवेकर (27, वालोपे) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद अतुल सुधीर ठाकूर (चिपळूण पोलीस ठाणे) यांनी दिली. मंगेश हा वालोपे-गणेशवाडी येथे वाशिष्ठी नदीच्या किनारी झाडीझुडपाच्या अडोशाला हातभट्टी चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार चिपळूण पोलिसांनी त्याच्यावर धाड टाकली. या धाडीत पोलिसांना दारु उपयोगी साहित्यामध्ये गुळ, नवसागर मिश्रित कुजके रसायन, तर 20 लिटर गावठी दारु आढळून आली. त्यानुसार सुमारे 1 लाख 9 हजार 900 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.