चिपळूण : चिपळूण शहरालगत कळंबस्ते येथे बिबटया वाघ पिसळला असून त्यांनी अनेक कुत्र्यांची व जनावरांची शिकार केली आहे. यामुळे जनतेमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेली तीन महिन्यांपासून अधुन मधुन रात्रीचा हा बिबटया वाघ कळंबस्ते व आजु-बाजुच्या परिसरामध्ये फिरत आहे. हे गावातील अनेक सि.सी.टीव्ही कॅमरामध्ये दिसुन आल आहे व याची पायचल जनतेला लागुन राहिली आहे.
लोटे परशुराम व इतर कंपनीममधुन रात्री उपरात्री कामावरुन येणारे कामगारांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. दोन महिन्यापुर्वी कळंबस्ते ग्रामपंचायतीने वनविभागाकडे संपर्क साधला होता, तेव्हा वनविभागाचे दोन शिपाई गावातुन येवुन गेले होते. गेली तीन महिने सतत बिबटया वाघ गावामध्ये फिरत आहे. याकडे वनविभाच्या अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारच्या ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्याकडे संपर्क साधलेला नाही व कोणतीही उपाययोजना केलेली नाही. यामुळे कळंबस्ते व आजुबाजुच्या ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरुन भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दि. १८ ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायत व गावातील ग्रामस्थ यांनी माजी सभापती व पर्यावरण प्रेमी शौकत मुकादम यांची भेट घेवुन वरील विषयासंदर्भात चर्चा केली. व वनविभाग अधिकाऱ्याकडे शौकत मुकादम, सरपंच विकास गमरे, उपसरपंच गजानन महाडीक व इतर यांनी वरील विषयावर तातडीने उपाययोजना करावी असे संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले आहे व उपाययोजना करण्याची मागणी केली आहे