12 क्रीडा प्रकारात 7 खेळाडूची मैदानी विभागीय स्पर्धेसाठी निवड
सावर्डे:-क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे आणि रत्नागिरी जिल्हा क्रीडा कार्यालय रत्नागिरी यांच्या विद्यमाने एस व्ही जे सी टी क्रीडा संकुल डेरवण येथे आयोजित जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेमध्ये सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावर्डेचे 7 विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली असून जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची नामी संधी विद्यालयाच्या खेळाडूंना प्राप्त झाले आहे.
विद्यालयातील खेळाडू स्वराज जोशी 3000 मीटर धावणे प्रथम,१५०० मीटर धावणे प्रथम आणि क्रॉसकंट्री प्रथम क्रमांक मिळवला आहे. श्रेयश ओकटे याने 400 मीटर धावणे, द्वितीय आणि 400 मीटर अडथळा प्रथम क्रमांक मिळवला आहे. अर्ष अडरेकर गोळाफेक मध्ये द्वितीय,समृद्धी बामणे उंच उडी प्रथम,400 मीटर धावणे तृतीय,200 मीटर धावणे तृतीय क्रमांक मिळवला आहे. कुणाल म्हसकर 200 मीटर धावणे द्वितीय,मुक्ता भुवड 400 मीटर धावणे तृतीय,हुमेरा सय्यद 800 मीटर धावणे प्रथम,१५०० मीटर धावणे प्रथम,अनुजा पवार 3000 मीटर धावणे प्रथम आणि १५०० मीटर धावणे द्वितीय क्रमांक मिळवला आहे. ४ x १०० रिले मुली तृतीय क्रमांक ४ x ४०० रिले मुली द्वितीय क्रमांक मिळवला आहे. प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवलेल्या खेळाडूंची निवड कोल्हापूर विभागीय मैदानी स्पर्धेसाठी झाली आहे. खेळाडूंना क्रीडाशिक्षक रोहित गमरे , अमृत कडगावे,दादासाहेब पांढरे व प्रशांत सकपाळ यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार शेखर निकम, अध्यक्ष बाबासाहेब भुवड, शालेय समितीचे चेअरमन व संचालक शांताराम खानविलकर,सचिव महेश महाडिक,सर्व संस्था पदाधिकारी,पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष, विद्यालयाचे प्राचर्य राजेंद्र वारे,उपप्राचार्य विजय चव्हाण, पर्यवेक्षक उद्धव तोडकर,पालक,शिक्षक व विद्यार्थ्यांनी या खेळाडूंचे कौतुक केले असून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना मार्गदर्शक