संगमेश्वर:-तालुक्यातील साडवली बौध्दवाडी येथे शुक्रवार 19 ऑक्टोबर रोजी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास बिबट्याने पाड्यावर हल्ला करून ठार केल्याची घटना घडली.
साडवली बौध्दवाडी येथील शेतकरी सुभाष राठोड यांच्या साडेतीन वर्षाच्या पाड्यावर अचानक बिबट्याने हल्ला केला. अचानक हल्ल्याने राठोडही घाबरून गेले. त्यांनी पाड्याला वाचविण्यासाठी आरडा ओरड करत शर्थीचे प्रयत्न केले. मात्र राठोड यांना पाड्याला वाचविण्यात अपयश आले. हा प्रकार राठोड यांनी तत्काळ वनविभागाच्या निदर्शनास आणून दिला. याची दखल घेत वनपाल तौफीक मुल्ला, वनरक्षक सहयोग कराडे, आकाश कडुकर, अरूण माळी, सुरज तेली, सरपंच संतोष जाधव, उपसरपंच विनोद वाडकर, आक्या वासिध्द, पोलीस पाटील अनुराधा डोंगरे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. राठोड यांचे सुमारे 15 हजार रुपयांचे नुकसान झाले. राठोड यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी साडवलीवासियांमधून होत आहे.