स्थानिक कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांचा तीव्र विरोध
राजन लाड/राजापूर:-राजापूर तालुक्याच्या पश्चिमेकडील एका सरपंचाच्या आडमुटी आणि भ्रष्टाचारी कामामुळे अनेक ग्रामस्थांनी शासन आणि प्रशासनाकडे अनेक तक्रारी दाखल केल्यामुळे चौकशीचा ससेमिरा मागे लागला आहे. गावातील अनेक ग्रामस्थांना प्रत्येक गोष्टीत अडवणूक करणाऱ्या सरपंचाच्या विरोधात गावात तीव्र नाराजी आहे. पाणीपुरवठा योजनेच्या नावाखाली प्रशासनाची आणि शासनाची दिशाभूल करण्याबरोबरच वाडीवाडीत आणि ग्रामस्थांमध्ये वाद लावण्याचे काम जाणीवपूर्वक करत असल्याचे आरोप होत आहेत.
महात्मा गांधी तंटामुक्त समिती सारख्या कमिटीच्या अध्यक्षांनी सचिवांना वाद तंटे यावर चर्चा करण्याबरोबरच महात्मा गांधी जयंतीला जागा सुद्धा उपलब्ध करून न देणाऱ्या सरपंचाच्या या भूमिकेमुळे नुकतेच ग्रामसभेने तंटामुक्त समितीच न करण्याचा ठराव केला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या खासदारकीच्या निवडणुकीत महायुतीतील एका पक्षाचा तालुकाध्यक्ष आणि कार्यकर्ता असताना देखील पाकीट न मिळाल्यामुळे नारायण राणे यांना मतदान न करता नोटाला मतदान करा असे सांगणाऱ्याला शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा बालेकिल्ला असून देखील नारायण राणे यांना गावातून जास्त मतदान करून ग्रामस्थांनीच उघडे पाडले होते.
आता संपूर्ण तालुकाभर वेगवेगळ्या गावातून शिवसेना शिंदे गटात नामदार उदय सामंत आणि किरण सामंत यांच्या कार्याचा झपाटा पाहून अनेक जण प्रवेश करत असताना आपल्या मागे लागलेल्या चौकशीचा ससे मिला टाळण्यासाठी आणि प्रशासनावर दबाव पडावा यासाठी शिवसेना शिंदे गटात मागच्या दारातून प्रवेश करण्यासाठी धडपड सुरू आहे.
याविषयी माहिती मिळताच स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये आणि ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली असून. सर्वांच्या वाकड्यात शिरणाऱ्या त्या सरपंचाला प्रवेश देऊ नये असे सर्वच कार्यकर्त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना सांगितले असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
त्या सरपंचाला शिवसेना शिंदे गटात प्रवेश दिल्यास त्याच्यावरील नाराजीचा फटका शिवसेना शिंदे गटाला नक्कीच बसणार असे बोलले जात आहे.याची पूर्वकल्पना देखील स्थानिक कार्यकर्त्यांनी वरिष्ठांना दिली असल्याचे विश्वसनीय वृत्त असून वरिष्ठांनी सर्व माहिती घेऊन निर्णय घ्यावा आपली अशी अपेक्षा स्थानिक कार्यकर्त्यांची असल्याचे समजते.