खेड:- जिल्ह्यात अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे.सोमवारी रात्रीच्या सुमारास मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटामुळे झालेल्या परतीच्या मुसळधार पावसाचा तालुक्याला तडाखा बसला.
चींचघर-मेटकरवाडी येथील भागोजी सीताराम मेटकर यांच्या घरावर वीज कोसळून मोठी हानी झाली. वीज उपकरणेही जळाली. 12 वर्षीय चिमुरड्याच्या हातासह तोंडावर ठिणग्याही पडल्या. सुदैवाने त्याला गंभीर दुखापत झाली नाही.
धो-धो कोसळणा-या पावसामुळे साऱ्यांची दाणादाण उडाली. रात्रीच्या सुमारास खंडित वीजपुरवठ्यामुळे नागरिकांना अंधारात चाचपडावे लागले. रात्रभर पावसा धुमाकूळ सुरा होता. चिंचघर-मेटकरवाडी येथील घरावर कोसळलेल्या विजेमुळे वीज उपकरणे जळून खाक झाली. सुदैवाने 12 वर्षीय चिमुरडा बालंबाल बावला. दुर्घटनी माहिती मिळता माजी आमदार व जिल्हाप्रमुख संजय कदम यांनी मंगळवारी सकाळी मेटकर कुटुंबियांची भेट घेतली.
या कुटुंबियांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी, यासाठी तलाठी यांना घटनास्थळी बोलावून पंचनामे करून घेतले. तहसीलदार सुधीर सोनावणे यांयाशी संपर्क साधून लवकरात-लवकर त्यांना आर्थिक मदत देण्याबाबत सूचना केल्या. महावितरणच्या अधिका-यांनाही वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबत सूचना केल्या. तालुक्यात अन्य गावांनाही परतीच्या पावसाचा तडाखा बसला. मंगळवारीही दुपारच्या सुमारास पावसाने झोडपून काढले.