एस. टी. बस न सोडल्याने विद्यार्थांना जावे लागले चालत
देवरुख:- देवरुख एस. टी. आगारातून कानरकोंड बस फेरी न सुटल्याने विद्यार्थ्यांना चालत जावे लागले. मंगळवारी ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेत आगार व्यवस्थापक दालनात ठीय्या आंदोलन केले. ग्रामस्थांच्या संतप्तेपुढे एस. टी, प्रशासनाने नमते घेत बस फेरी सोडली. विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेली बस कायम स्वरुपी सुरू ठेवावी असे निवेदन आंबेड बुद्रुक ग्रामपंचायतीच्यावतीने सादर करण्यात आले. बस फेरी बंद होवून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास ग्रामस्थ तीव्र आंदोलन करतील इशारा दिला आहे.
संगमेश्वर तालुक्यातील आंबेड बुद्रुक गाव डोंगरात वसलेला आहे. या गावात शिगवणवाडी, गुरववाडी, दुर्गवाडी, कानरकोंड अश्या दुर्गम वाड्या आहेत. या भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी कोळंबे हायस्कुल, पैसाफंड हायस्कुल, बुरंबी हायस्कुल येथे येतात. या विद्यार्थी, ग्रामस्थ यांना ये- जा करण्यासाठी देवरूख आगारातून बस फेऱ्या सोडण्यात आल्या आहेत. या बसफेरी विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र गत दोन दिवसात देवरूख कानर कोंड बसफेरी न सुटल्याने या भागातील सुमारे 60 विद्यार्थ्यांना 8 कि. मी. चालत जावे लागले. सोमवारी सायंकाळी विजांचा कडकडात, मुसळधार पावसातून विद्यार्थ्यांनी नाइलाजाने घर गाठले. विज पडून अनर्थ घडल्यास याला जबाबदार कोण असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला.
मंगळवारी सकाळी बस फेरी न आल्याने ग्रामस्थांचा संतापाचा पारा चढला. ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत विद्यार्थ्यांना घेवून देवरूख बसस्थानकात धडक दिली. बसफेरी न सोडल्यामुळे विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासा पाढा एस.टी. अधिकाऱ्यांसमोर कथन करण्यात आला. यावर अधिकारी वर्गाने बस संख्या कमी आहे, डिझेलचा तुटवडा आहे अशी उत्तरे ग्रामस्थांना दिली. विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी शासन एकीकडे नवनवीन योजना राबवत आहे तर दुसरीकडे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी बस फेरी बंद हे विदारक चित्र पहायला मिळाले.
जोपर्यंत देवरूख कानर कोंड बसफेरी सोडत नाहीत तोपर्यंत विद्यार्थी ग्रामस्थ या दालनातून हलणार नाहीत अशी भूमिका घेतली. अखेर अधिकारी वर्गाने ग्रामस्थांसमोर नमते घेत विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी बसफेरी सोडली. यामुळे ग्रामस्थ शांत झाले. विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेली सकाळी 9 व सायंकाळी 5 वाजती बस कायम स्वरूपी सुरू ठेवावी असे निवेदन आंबेड बुद्रुक ग्रामपांयताया वतीने सादर करण्यात आले. बस फेरी बंद झाल्यास ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. ग्रामस्थांना शिवसेना उबाठा गटाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पाठींबा दिला.
यावेळी आंबेड बुद्रुक ग्रामपांयतो सरंपा सुहास मायंगडे, उपसरपां सोयेब भाटकर, अनिरूध्द मोहिते, हरीशांद्र गुरव, पभाकर गुरव,ाांद्रकांत भोसले, अशोक भडेकर, दिनेश गुरव, काशिनाथ शिगवण, मनोज गुरव, दिपक गुरव, विजय टाकळे,. देवरूख आगारातील सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक राहुल मलुष्टे, पकाश सावंत, संतोष जाधव यांसह शिवसेना उबाठा गटो तालुकापमुख बंड्या बोरूकर, मुन्ना थरवळ, दादा शिंदे,तेजस भाटकर, दर्शन भाटकर, दिपक भेरे उपस्थित होते.