रत्नागिरी:- शहरानजिकच्या फणसवळेतील कुंदन दिनेश शिंदे (वय 21, रा. भावेवाडी,) या तरुणाचा निवखोल येथे विजेचा शॉक लागून झालेल्या मृत्यूप्रकरणी फणसवळे ग्रामस्थ, नातेवाईक व उबाठा, भाजपचे लोकप्रतिनिधी महावितरण कंपनीवर धडकले. त्यावेळी महावितरण व संबधित ठेकेदार यांची जोरदार कानउघडणी केल्यानंतर कुंदन याच्या कुटुंबियाला 4 लाखाचा भरपाईचा धनादेश देण्यात आला. तर या पूर्वीच्या गणेशोत्सवात मालगुंड येथील अशा प्रकरणातील साळवी कुटुंबियांनाही 4 लाखां पदान करण्यात आला.
महावितरणमध्ये कंत्राटी तत्वावर कर्मारी असलेल्या कुंदन दिनेश शिंदे या तरूणाचा निवखोल येथे विजेचा शॉक लागून मृत्यू झाला होता. ही दुर्दैवी घटना घडुन देखील ग्लोबल सर्व्हिसेस प्रायव्हेट लि. या कंपनीचा ठेकेदार वर्मा यांने कोणतीही दखल न घेतल्यामुळे कुटुंबासह, गावकर आणि स्थानिक शिवसेना, भाजपचे पदाधिकारी संतप्त होऊन महावितरण कंपनीवर धडकले होते. त्यावेळी महावितरणमध्ये झालेल्या बैठकीमध्ये मयत कुंदन शिंदे यांच्या कुटुंबियाला 4 लाखाची भरपाई, नात्यातील एकाला कंपनीत कामाला, पेन्शन आणि ठेकेदार कंपनीकडुन 25 लाखाचा भरपाई देण्याचा मागणी केली होती.
परंतु या विषयाचा पुढे काहीच झाले नाही. त्यामुळे सोमवारी पुन्हा फणसवळे ग्रामस्थ, नातेवाईक महावितरण कंपनीवर धडकले. अखेर उबाठो लोकप्रतिनिधी उदय बने, उपजिल्हाप्रमुख शेखर घोसाळे, फणसवळे सरपंच लोंढे, उपसरपंच गौरव नाखरेकर, सदस्य रवि पवार, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, तालुकाध्यक्ष दादा दळी, तसा फणसवळेतील ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी या प्रश्नी महावितरणचे अधिकारी व ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी यांना जोरदार खडसावले. आर्थिक मदत देण्याचे जोरदार मागणी लावून धरली. त्यामुळे कुंदन याच्या कुटंबियाला 4 लाखाची भरपाईचा धनादेश देण्यात आला. तर मालगुंड येथील अशा एका प्रकरणातील साळवी कुटुंबियांचाही धनादेश उदय बने यांच्या रेट्यामुळे तातडीने देण्याची कार्यवाही करण्यात आली.