रत्नागिरी:- शहरातील राजीवडा येथील महिलेचा प्रसुतीदरम्यान ह्दयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल़ा ही घटना शनिवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास घडली. निहा इब्राहिम बुडये (30, रा. राजीवडा रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे.
या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिसांत करण्यात आली. निहा यांना पसुतीसाठी रत्नागिरीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होत़े 12 ऑक्टोबर रोजी त्यांना हदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला. अशी नोंद शहर पोलिसांत करण्यात आली आहे.