दापोली:- दापोली तालुक्यातील पालगड मळेकरवाडी येथे पहिल्यांदा गव्याचे दर्शन झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे.
या आधी बांधतिवरे परिसर, गिम्हवणे वणंद येथे गवा दिसून आला होता. तर आता पालगड येथे गवा रेडा दिसून आला आहे. पालगड येथील रस्ता हा जंगलमय भागातील असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तरी या गव्याचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरत आहे. तसा गवा हा शेतीचे नुकसान करेल अशी भीती देखील शेतकरी वर्गामध्ये निर्माण झाली आहे.