दापोली:-महाविद्यालयीन युवतीची एसटी बसमध्ये छेड काढणा-या माजिद तांबोळी या वाहकाची न्यायालयीन कोठडीत परवानगी करण्यात आली आहे.
दापोली तालुक्यातील कोळथरे-दापोली या मार्गावरील बसमध्ये पंचनदी येथे दोन दिवसांपूर्वी हा प्रकार घडला होता. सदर प्रकार घडल्यावर गाडीतील युवतींनी व ग्रामस्थांनी सदर वाहकाला चोप दिला होता. याबाबत दाभोळ सागरी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती दाभोळ सागरी पोलीस स्थानकाच्या सूत्रांनी दिली.