संगमेश्वर पोलिसांनी केले तिघांना अटक
संगमेश्वर:- आंघोळ करताना विवाहितेचे चित्रीकरण केल्याप्रकरणी संगमेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तिघांना अटक करण्यात आली आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी विवाहिता या त्यांच्या घराच्या मागच्या बाजुला असलेल्या बाथरुममध्ये आंघोळ करीत होत्या. त्यांना अंघोळ करताना घरावरील छताला भोक पाडून त्यामध्ये मोबाईल ठेवलेला दिसला.
मोबाईलच्या कॅमेराद्वारे फिर्यादीला आंघोळ करतानाचे चित्रिकरण चालु असल्याचा संशय आल्याने फिर्यादीने मोबाईल ताब्यात घेऊन आपल्या पतीला याबाबत सांगितले. सदरचा मोबाईल हरेष रमेश डिके याचा असल्याचे निष्पन्न झाले. हा प्रकार तिघांनी संगनमताने केल्याने आणखी दोन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास संगमेश्वर पोलीस करीत आहेत.