गुहागर/उदय दणदणे:-महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या संयोगाने व त्यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील मुलांची आरोग्याची काळजी घेत जि .प.शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या आरोग्य तपासणी शिबिराला उदंड प्रतिसाद मिळत असून गेली १५ दिवस सदर शिबीर विविध जि. प. शाळांत राबविले जात आहेत.
चष्मा, रक्तगट तपासणी नाक,कान, घसा अश्या आरोग्य विषयी ह्या तपासणी होत आहेत.मंगळवार दि.०८ ऑक्टोबर २०२४ रोजी जि. प.शाळा अडूर भाटले येथे सदर आरोग्य तपासणी शिबीर अपरांत हॉस्पिटल डॉ.रजनिश रेडीज -मेडीकल प्रमुख,सचिन पोकळे -जनसंपर्क अधिकारी,नर्स स्टाप यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले होते,सदर शिबिरात जवळ जवळ ८० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.सदर शिबिराला शाळा समिती सह मुख्याध्यापक प्यारेलाल मोते यांचे विशेष सहकार्य लाभले,तर मनसे तालुका अध्यक्ष सुनील हळदणकर, उप तालुकाध्यक्ष जितेंद्र साळवी,नितीन कारकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली, शिबीर यशस्वी होण्यासाठी पालशेत विभाग अध्यक्ष प्रसाद विखारे,रोहित दणदणे,सुजल कुळे सह मनसे सैनिक यांनी मेहनत घेतली.