दापोली:-तालुक्यातील सालदुरे येथे राजेन गोकुळ शिंदे या 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवार रोजी घडली.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेन शिंदे हे आजारी होते. त्यांच्या पायाला दुखापत झाली होती. यामुळे अशक्तपणा आल्याने उपारासाठी मंगळवारी 1 ऑक्टोबर रोजी दापोली उपजिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. त्यांयावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू असताना 2 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. या बाबत दापोली पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.