राजापूर:पाचल पंचक्रोशी धनगर समाजातर्फे दसऱ्यानिमित्त येत्या १३ ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय गजानृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सह्याद्रीच्या खोऱ्यात डोंगर-दऱ्यांत राहणारा धनगर समाज अजूनही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे.
हातावरचे पोट असणाऱ्या या समाजातील काही तरुण पुढे सरसावून समाजातील अनुभवी व्यक्तींना सोबत घेऊन आपल्या समाजाची वज्रमूठ बांधण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही वर्षांपासून पाचल पंचक्रोशी धनगर समाज एकत्रीकरण कऱण्यास यश आले आहे. कला, क्रीडा आणि सामाजिक काम करत असताना आणि त्याचाच एक भाग म्हणून दसऱ्याच्या निमित्ताने येत्या रविवारी १३ ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय गजानृत्य स्पर्धांचे आयोजित करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून १२ संघ ढोल, थाळा आणि वाक्यांच्या गजरात धनगरी परंपरा असलेल्या गजा नृत्याची झलक पाचलमध्ये दाखवण्यास उत्सुक आहेत. त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत पाचल पंचक्रोशी करेल, असे समाजाच्या प्रतिनिधींकडून सांगण्यात आले.