रत्नागिरी:-शहरातील पॉलिटेक्निकल कॉलेजच्या गेटसमोर हेरॉईन बाळगणा-या संशयिताला शहर पोलिसांकडून अटक करण्यात आली. शुकवारी सायंकाळी 7 च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. मतिन महामुद शेख (31, रा.उद्यमनगर, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आह़े त्याच्या ताब्यातून 31 पुड्यांमधील हेरॉईनसह 50 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.
पॉलिटेक्निकल गेटसमोर हेराईनची विकी होणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होत़ी त्यानुसार पोलिसांनी येथे सापळा रचून संशयित तरुणाला ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्या ताब्यात ब्राऊन हेरॉईन या अंमली पदार्थाच्या 31 पुड्या आढळल्या. तसेच त्याच्याकडून एक मोबाईल व दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतल़ी या पकरणी संशयिताविरुद्ध एऩ ड़ी प़ी एस. ऍक्टचे कलम 8 (क), 21 (अ) पमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.