चिपळूण : चिपळूण आगारात कार्यरत असलेले एसटी वाहक बालाजी गुंडेराव सुरनर यांना बसमध्ये सापडलेली रोख रक्कम 15 हजार व मोबाईल पुन्हा त्या मालकास परत केला. या प्रामाणिपणाबद्दल सुरनर यांचे आगार प्रशासनाकडून विशेष कौतुक होत आहे.
सुरनर हे चिपळूण ते ठाणे हे 2 दिवसापूर्वी एसटीत कामगिरी बजावत असताना त्यांना एका प्रवाशाची रोख रक्कम रुपये 15,000 व मोबाईल तसेच इतर महत्वाची कागदपत्रे असलेली बॅग सापडली होती. यावेळी सुरनर यांनी आगार प्रशासनाकडे संपर्क साधून यांची माहिती दिली. त्यानुसार आगार प्रशासनामार्फत संबंधित प्रवाशाला संपर्क साधून सर्व मौल्यवान वस्तू व रोख रक्कम परत करण्यात आली. त्या पवाशांनीही सुरनर यांचे धन्यवाद व्यक्त केले आहेत. सुरनर यांच्या सच्चाई व प्रामाणिकपणा बद्दल चिपळूण आगार प्रशासनाकडून कौतुक होत आहे.