लांजा:-लांजा पोलिसांनी सापुचेतळे येथे धडक कारवाई करत विनापरवाना देशी दारूची विक्री करणाऱ्याला ताब्यात घेतले आहे. या कारवाईत १६८५ रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई शुक्रवारी ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.४० वाजता करण्यात आली. त्यामध्ये सापुचेतळे येथील संतोष सोना चव्हाण यांच्या घरासमोरील गाळ्याच्या मध्ये असलेल्या बोळात एक जण विनापरवाना देशी मद्याची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी ४ ऑक्टोबर रोजी रोजी सायंकाळी ७.४० वाजता सापुचेतळे येथे धाड टाकली. यावेळी संतोष सोना चव्हाण (वय ४५, रा.चांदोर रोहिदासवाडी) हा देशी मद्याच्या दारूसाठ्यासह आढळून आला. यावेळी पोलिसांनी केलेल्या कारवाईत १६८० रुपये किंमतीच्या देशी दारू संत्र लेबल असलेल्या १८० मिली मापाच्या २४ बाटल्या आणि ५ रुपयांची एक मळकट रंगाची कापडी पिशवी असा एकूण १६८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त जप्त करण्यात आला.
या घटनेत विनापरवाना देशी दारूची विक्री केल्याप्रकरणी पोलिसांनी संतोष चव्हाण याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल तेजस मोरे हे करत आहेत.