गुहागर/उदय दणदणे:-गुहागर मतदारसंघात अनेक राजकीय चर्चांना उधाण आले असून,त्यात “आमचं ठरलंय” सोशल मीडियावर संतोष जैतापकर यांच मतदारांना आवाहन करणारा पोस्टर सद्या चर्चेचा विषय बनला आहे.
गुहागर भाजपाला गतवैभव प्राप्त करून देणारे भाजपा ओबीसी उत्तर रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष संतोष जैतापकर आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. भाजपा कडुन मा.आमदार डॉ. विनय नातू पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत, त्यामुळे गुहागर विधानसभा मतदारसंघात भाजपाकडून नेमकी कुणाला उमेदवारी मिळते याकडे राजकिय वर्तुळात लक्ष लागून राहिले आहे.वैद्यकीय सेवेतून संतोष जैतापकर यांनी या मतदारसंघात आपली आगळीख ओळख निर्माण केली आहे.
संतोष जैतापकर यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढावी अशी जनभावना आहे. मात्र भाजपा कडून संतोष जैतापकर यांना उमेदवारी दिली जाईल का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.