चिपळूण:- दुचाकीस्वाराने दोन पादचा-यास धडक दिल्याची घटना कळंबस्ते फाटा सॉमिल गेटजवळ 30 रोजी रात्री 11.15च्या सुमारास घडला. यात ते दोन पादचारी जखमी झाले असून या प्रकरणी त्या दुचाकीस्वारावर चिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राकेश राजाराम कदम असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. या बाबतची फिर्याद मंगेश मोहन महाडिक (34, चिपळूण) यांनी दिली, तर मंगेश महाडिक यांच्यासह किशोर केशव प्रभुलकर अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेश महाडिक व त्यों मित्र किशोर प्रभुलकर असे दोघेजण बाहेरून जेऊन घरी पायी चालत येत होते. असे असताना राकेश कदम याने त्यांना पाठीमागून धडक दिली. यात ते दोघे जखमी झाले असून या पकरणी दुचाकीस्वार राकेश कदम याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.