राजापूर/तुषार पाचलकर:-जगाला सत्य व अहिंसेची शिकवण देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच लाल बहादुर शास्त्री यांची जयंती आज संपूर्ण देशभरात साजरी करण्यात आली.
2 ऑक्टोबर हा राष्ट्रपिता महात्मा गांधींचा जन्मदिवस हा भारतात गांधी जयंती म्हणून आणि जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा म्हणून साजरा केला जातो. या दिवशी अनेक ठिकाणी वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जतात. राजापूर तालुक्यातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या तालुका कार्यालयात देखील आज का कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि आनंदात करण्यात आला.
यावेळी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या कार्याची माहिती देण्यात आली. गांधीजींचे विचार आजच्या तरुण पिढीला किती महत्वाचे आहेत हे पटवून देण्यात आले. यावेळी राजापूर तालूका काँग्रेस चे अध्यक्ष किशोर नारकर,माजी तालुकाधक्ष बंड्याशेठ बाकाळकर,माजी नगराध्यक्ष बाबुराव कोळेकर
राजापूर अर्बन बँक अध्यक्षा अनामिका जाधव,अर्बन बँक माजी अध्यक्ष लियाकत शेठ काझी,अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष मोहमद अली शेठ वाघु.जेष्ठकार्यकर्ते बाबुराव तांबे,जेष्ठ कार्यकर्ते प्रकाश आमकर,कमाल प्रभुलकर,शिराज प्रभुलकर,प्रतिष्ठित व्यापारी सतिश जोशी,इरफान डोसानी. इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.