राजापूर:-रयत शिक्षणसंस्थेच्या विखारे-गोठणे (ता. राजापूर) येथील आबासाहेब मराठे महाविद्यालयातर्फे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३७वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली.
त्यानिमित्ताने शहरामध्ये पारंपरिक वाद्य असलेल्या ढोलताशाच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयातर्फे शहरातील जकात नाका ते जवाहर चौक अशी यात्रा काढण्यात आली. सहभागी विद्यार्थ्यांच्या हातात असलेले फलक साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते. शोभायात्रेच्या माध्यमातून मराठे महाविद्यालयातून रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना शिक्षणाची द्वारे खुली करणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जीवनपट साऱ्यांसमोर उलगडण्यात आला. प्राचार्य डॉ. राजाराम राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या या शोभायात्रेमध्ये उपप्राचार्य डॉ. घनश्याम हराळे, मराठी विभागप्रमुख डॉ. संजय मेस्त्री, हिंदी विभागातील सहाय्यक प्राध्यापक अभिजित शेवडे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ सहभागी झाले होते.