रत्नागिरी:-रत्नागिरीतील मराठा मंदिर अ.के.देसाई हायस्कूलची विज्ञान नाटिका कोल्हापूर विभागात प्रथम आली आहे. कोल्हापूरातील या स्पर्धेमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर ,सांगली सातारा या प्रथम क्रमांक प्राप्त पाच विज्ञान नाटिका सादर झाल्या. त्यामध्ये जागतिक जल संकट, एआय आणि समाज, आरोग्य आणि स्वच्छता, हवामान बदल आणि त्याचे परिणाम या विषयावर भाष्य करणाऱ्या विज्ञान नाटय़ सादरीकरणाने बाजी मारली.
राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था नागपूर आणि शिक्षण उपसंचालक कार्यालय कोल्हापूर आयोजित विभागस्तरीय विज्ञान नाटय़ स्पर्धा 2024 आदर्श गुरुकुल विद्यालय पेठ वडगाव कोल्हापूर येथे उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेत मराठा मंदिर अ.के. देसाई हायस्कूलच्या जीवन वाचवा या विज्ञान नाटिकेला प्रथम क्रमांक मिळाला आहे. या संघाची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे. जीवन वाचवा या नाटिकेचे लेखन व दिग्दर्शन प्रशालेतील शिक्षक संतोष गार्डी यांनी केले होते.
विभाग स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त संघाचा सन्मान व बालकलाकारांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. जीवन वाचवा या नाटकेमध्ये कुमारी तनया सुरेश लिंगायत, कुमार भावेश गौतम खरात, कुमार चांदबी मेहबूब शेख, कुमारी रीया रमेश खेत्री, कुमारी आरोही शंकर शिंदे, कुमारी महेक सलीम मुल्ला, कुमारी पूर्वा चंद्रकांत कांबळे, कुमारी लावण्या लखन साळुंखे यांनी उत्कृष्ट भूमिका केल्या.नाटिका यशस्वी होण्यासाठी शिक्षिका सौ. अंजली संतोष पिलणकर यांचे उत्तम सहकार्य लाभले. त्याचबरोबर कुमारी सानिका दिलीप वाडेकर ,कुमारी अलिशा सुनील जाधव यांनी वेशभूषा सांभाळली तर कुमार अमन सुनील जाधव ,कुमारी सुखदा शिवाजी गावकर, कुमारी.रितू रामचंद्र आखाडे, कुमार विकस सियाराम देवांगण यांनी रंगमंच व्यवस्था उत्तम बजावली होती. या उत्तुंग यशाबद्दल प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रज्ञा दळी यांनी सर्वच बालकलाकारांचे कौतुक केले. त्याचबरोबर प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक शिक्षक संघ, माजी विद्यार्थी संघटना आणि मराठा मंदिर विद्यावर्धिनीचे सन्माननीय अध्यक्ष योगेश पवार व सर्व पदाधिकारी यांनी बालचमूचे कौतुक केले जात आहे.