लांजा:-रानात गुरे चरविण्यासाठी गेलेल्या एका ६५ वर्षीय महिलेचा आकस्मिक मृत्यू होण्याची घटना तालुक्यातील गोळवशी तेलीवाडी येथे रविवारी घडली. याबाबतची खबर तिच्या मुलाने लांजा पोलीस ठाण्यात दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळवशी तेलीवाडी येथील सुमती दत्ताराम तेली (वय ६५) ही महिला रविवार २९ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता नेहमीप्रमाणे ओमळी या ठिकाणी रानात गुरे चरविण्यासाठी गेली होती. मात्र दुपारी १ वाजला तरी ती गुरे घेवून घरी न परतल्याने तिच्या घरातील लोकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला असता ती ओमळी या ठिकाणा पासून जवळच असलेल्या धावजी मंदिर येथील पुलाजवळ नदी पात्रातील पाण्यात मृतावस्थेत आढळून आली.
याबाबतची खबर तिचा मुलगा तानाजी दत्ताराम तेली याने लांजा पोलीस ठाण्यात दिली आहे. याबाबत अधिक तपास लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड.कॉन्स्टेबल तेजस मोरे हे करीत आहेत.