संगमेश्वर:-तालुक्यातील वांद्री येथील शाळकरी मुलींशी गैरवर्तन केल्याप्रकरणी संजय मुळ्ये या शिक्षकाला ग्रामस्थांनी पोलिसांच्या हवाली केल्याचं प्रकरण ताज असताना संगमेश्वर तालुक्यात आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका वसतिगृहात मुलींसोबत किळसवाणा प्रकार घडला. या प्रकाराने तालुका हादरला आहे. या प्रकरणाची गुप्तता पाळण्यात आली आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी या प्रकरणात लक्ष घातले आहे. अशा घटना आता वाढीस लागल्याचे आवर घालण्यासाठी जिल्हास्तरावरून ठोस पावले उचलली जात आहेत.
एका वसतिगृहात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन होत असल्याची ऑनलाईन तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणाचा तपासासाठी पोलीस रवाना झाले आहेत असे समजते.
मात्र दुसऱ्या बाजूला या प्रकाराला एका मुलीने वाचा फोडण्याचे काम केले आणि एका ऑडिओमुळे हा प्रकार समोर आला अस बोललं जात आहे. गेली ३-४ वर्षे हे मुलींचे वसतिगृह सुरू आहे. अनेक ग्रामीण भागातील गरजू, गरीब मुलींना वाडी, पाड्यावरून आणून शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र उद्देश जरी चांगला असला तरी कृत्य मात्र निंदनीय घडल आहे. या मुलींच्या वसतिगृहासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. मुलींशी वाईट प्रकारे संस्था चालक वागत असल्याचे बोलले जात आहे.
एक निनावी तक्रार रत्नागिरी पोलिसात ऑनलाईन दाखल करण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्या दृष्टीने तपासाचा भाग म्हणून या संस्था चालकाची चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांनी गांभीर्याने यामध्ये लक्ष घालून तपास सुरू केला आहे. रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षक, रत्नागिरी जिल्हाधिकारी, समाज कल्याणचे पदाधिकारी या वसतिगृहात चौकशीसाठी गेले असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र या प्रकरणात सत्य अजून पुढे आलेले नाही. गुप्तता पाळण्यात आली आहे.