रत्नागिरी : शहरातील मिरकरवाडा जेटीच्या पाण्यामध्ये खलाशाचा मृतदेह आढळून आल़ा. ही घटना शनिवारी सायंकाळी 6 च्या सुमारास उघडकीस आल़ी. यज्ञ बहादुर डंगोरा (35, ऱा नेपाळ, सध्या मिरकरवाडा, रत्नागिरी) असे मृताचे नाव आह़े. या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिसात करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यज्ञ डंगोरा हा मिरकरवाडा येथे मच्छीमार बोटीवर खलाशी म्हणून कामाला होत़ा. गुरुवारी तो कुणाला काही न सांगता अचानक बेपत्ता झाला होत़ा. 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 च्या सुमारास यज्ञ डंगोरा याचा मृतदेह मिरकरवाडा जेटीच्या पाण्यात दिसून आल़ा. त्यानुसार या घटनेची खबर रत्नागिरी शहर पोलिसांना देण्यात आल़ी. याप्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आह़े.