रायगड : जिल्ह्यातील महाड तालुक्यात तेलंगे मोहल्ला येथे एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना उघड झाली आहे. लग्नाचे आमिष दाखवून ३४ वर्षीय तरुणाने या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला ,याबाबत महाड तालुका पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित तरुणी ही महाड तालुक्यातील तेलंगे गावातील असून आरोपी अबिब लियाकत पोपेरे वय ३४ राहणार आंबेत, तालुका म्हसळा, येथील रहिवासी आहे. आरोपी आदिब याने लग्नाचे आमिष दाखवून पीडित तरुणीला सापे गावाचे जंगल आणि म्हसळा गावाजवळील फार्म हाऊस या ठिकाणी वारंवार लैंगिक अत्याचार केले. याबाबत पीडित अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांकडून. तक्रार करण्यात आल्यानंतर महाड तालुका पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात ६४ (२) (एम), ६५ (१), BNS सह ४,६,१२, पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास तपासणी अंमलदार पोलीस उपनिरीक्षक खेडकर हे करत आहेत.