लांजात किरण सामंत यांच्या प्रभाग बैठकांचा सपाटा; नागरिकांकडून प्रतिसाद
लांजा : माझ्यावर टिका करणाऱ्यांना मी कामातून उत्तर देत असतो आणि मी जनतेशी बांधील आहे. त्यामुळे मला आमदार करायचे की नाही हे जनता ठरवेल. मला खात्री नाही तर पूर्ण विश्वास आहे की माझ्या विजयाचे साक्षीदार लांजावासीय होतील. असा विश्वास किरण सामंत यांनी लांजा येथे बोलताना व्यक्त केला.
लांजा तालुक्यासह शहरात सद्धया किरण सामंत यांचा बैठकांचा सपाटा सुरू आहे. अशातच लांजा शहरातील तेलीवाडी, मुजावरवाडी व नेवरेकरवाडी या प्रभाग क्र.९ मध्ये किरण उर्फ भैय्या सामंत यांची गुरुवार २६ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता तेलीवाडी येथे बैठक संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. बैठकीच्या सुरुवातीला “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” ही योजना राबविताना चांगले काम केल्याबद्दल प्रभाग मधील अंगणवाडी सेविका श्रीमती.मोरे आणि आशा सेविका आयेशा बागवान यांचा किरण सामंत यांच्यातर्फे सन्मान करण्यात आला.
यावेळी पुढे बोलताना किरण सामंत यांनी लांजातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी निश्चित मार्ग काढणार असल्याचा शब्द नागरिकांना दिला. तुमचा विकास हेच माझे ध्येय असून लांजा वासियांचा सर्वांगीण विकासाची जबाबदारी तुमचा हक्काचा माणूस म्हणून किरण सामंतची आहे. गेल्या १५ वर्षात लांजा शहर आणि तालुक्यातील विकास कुठे हरपला.? याचा शोध घ्यावा लागेल. मात्र चिंता करू नका महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांच्या माध्यमातून रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत आणि माझ्या माध्यमातून या लांजात विकासाची गंगा येईल. मी बोलणारा लोकप्रतिनिधी नसून काम करून दाखवणारा कार्यकर्ता आहे. माझी काम करण्याची पद्धत वेगळी आहे, मी जाग्यावर न्याय देतो. एकदा दारात आला की त्याचे काम होणे माझ्या हेतूने गरजेचे असते. मी जात किंवा पक्ष पाहून काम करत नाही. जनतेला आलेल्या अडचणीत सोडवण्याचे काम करतो. तसेच भविष्यात आपण सर्वांनी निवडणुकीमध्ये मला आशिर्वाद द्याल अशी अपेक्षा करतो, असे किरण सामंत यांनी उपस्थित नागरिकांना सांगितले.
दरम्यान, यावेळी बैठकिला शिवसेना विधानसभा क्षेत्रसंघटक सुनिल (राजू) कुरूप, लांजा तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, नगराध्यक्ष मनोहर बाईत, एस.एन.कांबळे, बाबा भिंगार्डे, प्रसादभाई शेट्ये, प्रभाग क्र.९ चे नगरसेवक रफिक (गुल्ल्या) नेवरेकर, सचिन डोंगरकर, बापू लांजेकर, नंदराज (लल्ल्या) कुरूप, इकबाल खतीब, सईद मापारी, राजू मुजावर, हसन मुजावर, रामदास लांजेकर, उमेश लांजेकर, चंद्रकांत रहाटे, नजीर नेवरेकर, रियाज नेवरेकर, दिलदार मुजावर, नाजीम नेवरेकर, बाबु पावसकर, राजेश लांजेकर, हुसैन नेवरेकर, मोहम्मद सारंग, विकास लांजेकर, समीर लांजेकर, सागर जावडेकर, भरत लांजेकर, सादिक फुलारी, गफ्फार वजडी, आसिफ दसूरकर, शाहनवाज खान, शैवाल सिद्दीकी आदींसह शेकडो बंधु-भगिनी उपस्थित होते.