राजापूर : माहितीच्या अधिकारात मागितलेली माहिती देण्यास टाळाटाळ करणे, नियमांचे उल्लंघन करून ग्रामसभा लावून मनमानी कारभार करणाऱ्या राजापूर तालुक्यातील दळे ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामसेवक यांची चौकशी करण्याचे आदेश संगमेश्वर पंचायत समिती अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. याबाबतचा अहवाल राजापूर गटविकास अधिकाऱ्यांना सादर करण्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आदेश दिले आहेत.
माहिती अधिकार कायद्यान्वये माहिती न देणे तसेच नियमांचे उल्लंघन करून ग्रामसभा लावून मनमानी करत असल्याची अमोल शिरसेकर आणि ग्रामस्थांची तक्रार केली होती. दळे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील रहिवासी अमोल अरविंद शिरसेकर, प्रदेश प्रतिनीधी, राष्ट्रवादी काँगेस पार्टी यानी या कार्यालयाकडे तक्रार केली असून सदर अर्जामध्ये ग्रामपंचायत दळे, ता. राजापूर येथील ग्रामसेवक गोरक्ष शेलार हे माहिती अधिकार अंतर्गत माहिती देत नसल्याने आणि ग्रामपंचायत दळेची ऑगस्ट २०२४ मधील ग्रामसभेबाबत तक्रार नमुद आहे.
सदर प्रकरणी तक्रारदार यांनी माहिती अधिकार अंतर्गत माहिती मागवूनही एक वर्ष पेक्षा अधिक कालावधी ऊलटन गेला असून अद्याप त्यांना मागितलेली माहिती ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिलेली नाही तसेच ग्रामपंचायत दळे येथील ऑगस्ट २०२४ मधील ग्रामसभेबाबत वारंवार तक्रार करूनही ग्रामपंचायत तक्रारीचे निराकरण करत नसल्याबाबत दळे ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवक गोरक्ष शेलार आणि सरपंच महेश करगूटकर यांच्यावर फौजदारी कार्यवाही व या पंचायतीवर प्रशासक नेमण्याची मागणीबाबत तक्रार नमूद आहे. तसेच याबाबत वृत्तपत्रामध्ये ग्रामपंचायत दळे येथील सभेबाबत ग्रामस्थ तक्रारीची बातमी आल्याचे निर्देशानास येत आहे.
तक्रारदार व ग्रामस्थांनी याबाबत वारंवार तक्रार करूनही तक्रारीचे निरसण होत नसल्याने तक्रारदार यांनी मा. उपमुख्य कार्यकारी (ग्रापं) यांचेकडे स्वतंत्र चौकशी अधिकारी यांची मागणी केलो आहे. याबाबत संदर्भ क्र.०२ अन्वये मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रापं), जिल्हा परिषद रत्नागिरी यांचे मंजूर टिपणी नुसार सदर प्रकरणी संगमेश्वर पंचायत समितीचे हिंदुराव गिरी यांना चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले असून असून तक्रारदार यांचे समक्ष आपण तक्रादार यांचे मुद्यांचे अनुषंगान मुद्दे निहाय संबंधितांची चौकशी करण्यात येऊन स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल या कार्यालयास आठ दिवसात सादर करण्याची कार्यवाही करण्यात यावी असे आदेश देण्यात आले आहेत.
तसेच राजापूर गटविकास अधिकाऱ्यांनीही दळे ग्रामपंचायत विषयी असलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करून तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत