तालुका अध्यक्षपदी तुकाराम निवाते सचिव पदी ॲड.दिनेश कदम
गुहागर/उदय दणदणे:-गुहागर तालुका बळीराज सेनेची नूतन कार्यकारणी पक्षप्रमुख अशोकदादा वालम यांच्या आदेशानुसार तसेच जिल्हा अध्यक्ष पराग कांबळे संपर्काप्रमुख शरद बोबले यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच परळ मुंबई येथे घोषित करण्यात आली, तालुका अध्यक्षपदी खोडदे गावचे सुपुत्र तुकाराम निवाते तर सचिव पदी पाटपन्हाळे गावचे सुपुत्र कायदे तज्ञ दिनेश कदम तर सहसचिव पदी शिरचे मंगेश मते यांची निवड करण्यात आली.
गुहागर तालुका कार्यकारणी पुढील प्रमाणे तालुका अध्यक्ष तुकाराम निवाते सचिव दिनेश कदम यांचे सह सुभाष नितोरे (पालशेत जिल्हा परिषद गट )विशाल गोताड (तवसाळ जिल्हा परिषद गट ) सांदीप गोरीवले (वेळणेश्वर जिल्हा परिषद गट )अरुण भुवड (पाटपन्हाळे जिल्हा परिषद गट ) यांचे सह विजय नाचरे (खोडदे पंचायत गण प्रमुख )विनायक घाणेकर (पटपन्हाळे पंचायत गण )रामचंद्र आडवीलकर (तळवली पंचायत गण )शंकर मोरे (शीर पंचायत गण )यांचे सह गुहागर विधानसभा सह संपर्क प्रमुख पदी संतोष निवाते,अमित काताळे,मनोहर घुमे,प्रशांत भेकरे यांची पक्षाने निवड केली आहे, सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे पक्षप्रमुख अशोक वालम जिल्हा अध्यक्ष पराग कांबळे, रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख कृष्णा कोंबनाक, विधानसभा सपंर्क प्रमुख शरद बोबले व पदाधिकारी यांनी बळीराज सेनेचे वतीने अभिनंदन करून पुढील राजकीय वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान ग्रामीण वार्ताचे प्रतिनिधी यांचेशी बोलताना नूतन अध्यक्ष तुकाराम निवाते यांनी आपल्या निवडीनंतर म्हटलं कि गुहागर तालुक्यातील सर्वांगीण विकासासाठी बळीराज सेनेचे सर्व पदाधिकारी कार्य करतील सर्वाना सोबत घेऊन बहुजन समाजाला न्याय देण्यात येईल,बळीराज सेनेची नूतन कार्यकारणी जाहीर झाल्यावर तसेच दमदार जिल्हा अध्यक्ष व संपर्क प्रमुख मिळाल्याने सर्वच कार्यकर्त्यां मध्ये उत्साह संचारला आहे, बळीराज सेनेच्या एन्ट्री मुळे गुहागर विधानसभा मतदार संघात राजकीय दिशा बदलली आहे.