कोंडये येथील संदेश शिगवणचा ‘पुन्हा एकदा चौरंग’ उद्या प्रदर्शित
20 पेक्षा जास्त सिनेमाचे सह दिग्दर्शन, 30 पेक्षा जास्त नाटकामध्ये कला सादर
संगमेश्वर : कोकणातील तरुण नमन, खेळे, जाखडीच्या माध्यमातून आपली कला जोपासताना दिसत आहेत. संगमेश्वर तालुक्यातील कोंडये गावच्या एका 26 वर्षीय तरुणाने अशीच नमन, खेळे, शुटींग, नाटक या माध्यमातून आपल करियर घडवत सिनेमा क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे. संदेश सोनू शिगवण अस या तरूणाचं नाव आहे. त्याने आतापर्यंत 20 पेक्षा जास्त सिनेमाचे सह दिग्दर्शन, 30 पेक्षा जास्त नाटकामध्ये कला सादर केली आहे. उद्या संदेश याचा ‘पुन्हा एकदा चौरंग’ हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.
संदेश हा कामानिमित्त आणि कॉलेज निमित्त गेला होता. काम व कॉलेज करता करता नाटकात त्याला रुची निर्माण झाली. त्याचे अंतरंग थियटरमधून निनाद गावडे दिग्दर्शित ” ‘दिसत तसे नसत” या नाटकातून अभिनयाचा श्री गणेशा झाला . ऋषिकेश घोसाळकर यांचे ” हरी आला दारी” आणि संजय खापरे दिग्दर्शित ” गलतीसे मिस्टेक ” ही व्यावसायिक नाटक त्याने केली. नंतर हळूहळू सत्यजित परब यांच्या मार्गदर्शनाखाली नाटकामधील लाईट शोचा शिकला. त्यामुळे मराठीतील दर्जेदार नाटकासोबत हिंदी आणि गुजराती नाटकांचे लाईट ऑपरेट करता आले. मुक्ता बर्वे अभिनित आणि अनेक पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजेश जोशी यांचे ” कोड मंत्र” हे नाटक त्याने केले. अनिल काकडे यांचे “कळत नकळत” अभिर गुलाल, मंगेश सातपुते दिग्दर्शित “म्याड सखाराम” आणि सध्या रंगभूमीवर गाजत असलेले ३० वर्ष जुने अंकुश चौधरी, भरत जाधव आणि संजय नार्वेकर अभिनित व देवेंद्र पेम लिखित दिग्दर्शित ” ALL THE best ” हे नाटक नवीन संचासोबत रंगभूमीवर सुरु आहे. लवकरच या नाटकाचा 12 हजाराव्या प्रयोगाकडे वाटचाल करत आहे . लाईट डिझायनर म्हणून प्रभाकर मोरेंचे ” कुकडीकुक” हे नाटक केले. ऑपरेट करत असलेल्या सुनील मेस्त्री यांनी डिझाईन केलेल्या “आय अम पुंगळ्या ” या नाटकाला ह्या वर्षीचा महाराष्ट्र टाईम्सचे नॉमिनेश होते . हे शिकत असताना दिग्दर्शक म्हणून त्याने पहिले नाटक रुनेश तांबे लिखित “अवलक्षण” आणि नंतर ‘शेमारू’ मराठीसाठी प्रभाकर मोरे आणि किशोरी अंबिये अभिनित ” ‘आम्ही सगळे शहाणे ” हे नाटक दिग्दर्शित केले. हे करत असताना मला सिनेमा क्षेत्रातील दिग्दर्शन शिकायचे होते. अभिजित कुलकर्णीचा “भक्ष” हा लघुपटाला असिस्टंट दिग्दर्शक म्हणून त्याने काम केले. तिथून त्याचा सिनेमा क्षेत्राचा श्री गणेशा झाला. मग डॉल, कडवा सच आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राज प्रीतम मोरे यांची “बिचोलीया” हा लघुपट केला. स्वत; दिग्दर्शक म्हणून ” प्रेम कोणावर करायचे ” आणि ” व्हिजन ” हे लघुपट केले . यु ट्यूब साठी एक गाणे केले अभिनेता म्हणून ” तू दूर दूर जाताना ” केले.
दरम्यान संदेश याला पहिली फुल लेन्थ फिल्म मिळाली ती अमोल चौधरी दिग्दर्शित ” चिमणी ” आणि मग इथून त्याने मागे वळून पाहिलेच नाही. नंतर “बस्तर सागा” , ” भुतियापंती ” गिर्दाब ” ग्लोबल आडगाव ” मन मौजी ” पण खऱ्या अर्थाने सिनेमा शिकता आलां तो राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक अजय फणसेकर यांच्या “सिनियर सिटीझन ” सिनेमात. त्यानंतर नुकताच २४ मे ला प्रदर्शित झालेला प्रकश कुंटे दिग्दर्शित ” शक्तिमान ” सिनेमा त्याने केला . पण खऱ्या अर्थाने कमर्शिअल सिनेमा शिकता आला तो राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक रवी जाधव यांच्या ” टाईमपास 3″ या सिनेमात. या सिनेमात त्याने प्रमुख सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलेला” हलगट ” या सिनेमाला ह्या वर्षीचा महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला.
उद्या २७ सप्टेंबर २०२४ ला संपूर्ण महाराष्ट्रात संदेश याने प्रमुख सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलेला प्रताप गंगावणे लिखित आणि सागर मोहिते दिग्दर्शित , आरोही फिल्मची निर्मिती असलेला ” पुन्हा एकदा चौरंग ” हा सिनेमा प्रदर्शित होतोय, आणखी दोन सिनेमे येत्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहेत.
सामान्य शेतकरी कुटुंबातून जन्माला आलेल्या संदेश चंदेरी दुनियेत नशीब आजमावतोय.
यावेळी त्याने ज्या ज्या लोकांनी इथपर्यंत पोचण्यासाठी मदत केली त्या सगळ्यांचे त्याने आभार मानले. यामध्ये कुटुंबाचा आणि सर्व मित्रांचा आभारी आहे असे त्याने सांगितले. तसेच अजय फणसेकर , प्रमोद मोहिते , राजू झेंडे, अतुल मर्चंडे , प्रकाश कुंटे , संजय खापरे, प्रभाकर मोरे , सुनील पाटेकर , रवी जाधव, राजीव जोशी, अभिजित कुलकर्णी, संदीप शिगवण , अनिल काकडे , सत्यजित परब , अमित शिर्के, सुरेश दसम, दीपक शिंदे, सागर हुंबरे , प्रभाकर घान्गृम , पूजा गुरव , विशाखा घाणेकर -शिगवण, प्रकाश तांबे , राकेश जाधव, अमित माने यांचे त्याने आभार मानले.
ग्रामीण भागातील तरूणाचा हा सिनेमा उद्या प्रदर्शित होत आहे. प्रत्येकाने पहावा आणि संदेशच्या या सिनेमाचं कौतुक करावं असच सिनेमा आहे. आपल्या सर्वांचा पाठिंबा आणि आशीर्वाद हेच त्याच्यासाठी महत्वाचं आहे.