मुंबई : भारतात किडनीचा आजार आणि मूत्रपिंडाशी संबंधित समस्या वेगाने वाढत आहे. जीवनशैली, पर्यावरण आणि आहारांमुळे हा आजार होत आहेत. रक्त फिल्टर करणे, कचरा काढून टाकणे, इलेक्ट्रोलाइट्स संतुलित करणे आणि रक्तदाब नियंत्रित करणे यासाठी मूत्रपिंड महत्त्वाचे आहेत. त्यामुळे भारतात किडनीच्या वाढत्या आजाराला नियंत्रित करण्यासाठी आणि मूत्रपिंडासंबंधातील देखभालीत सुधारणा करण्यासाठी किडनीच्या आरोग्याला प्रभावीत करणाऱ्या कारणांना समजून घेतलं पाहिजे.
अति धूम्रपान किडनीच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. त्यामुळे रक्तदाब वाढतो आणि रक्त वाहिन्यांना नुकसान होतं. त्यामुळे क्रोनिक किडनी रोग (CKD) होतो. परिणामी किडनीच्या कार्याला बाधा येते.
खराब अन्न किडनासाठी हानीकारक
अन्नपदार्थांची गुणवत्ता हा एक महत्त्वाचा चिंतेचा विषय आहे. भारतात जड धातू, कीटकनाशक आणि अन्य हानिकारक पदार्थांमुळे जेवण विषाक्त होतं. त्यामुळे किडनीला त्याचा गंभीर धोका निर्माण होतो. कृषीवरील रसायनाचा मारा आणि अन्नपदार्थांच्या साठवणुकीच्या खराब पद्धतीमुळे विषाक्त पदार्थांचा आहारात समावेश अधिक होतो. त्याच्यामुळे किडनीवर परिणाम होतो. त्यामुळे ज्यात सोडियम आणि प्रिझर्वेटिव्हची मात्रा असते अशा अधिक अतिरिक्त प्रक्रिया न केलेले, पॅकेज्ड पदार्थांमुळे हायपरटेन्शन आणि मधुमेहाचा धोका वाढतो. किडनीच्या आजाराचं ते प्रमुख कारण असतं.
आहे. भारतात अनेक भागात स्वच्छ पाणी अत्यंत मर्यादित मिळतं. दूषित जलस्त्रोत लोकांना हानिकारक पदार्थ आणि जलजन्य रोगांना बळी पाडतात. त्याचा किडनीवर अतिरिक्त परिणाम होतो. पाण्यातील प्रदूषक घटक आणि जड धातूंमुळे दीर्घकाळपर्यंत किडनीवर परिणाम होतो. किडनीत खडे आणि संक्रमण होण्याची शक्यता असते. किडनीची समस्या रोखण्यासाठी समग्र आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी सुरक्षित आणि स्वच्छ पाणी देणं महत्त्वाचं आहे.